एकी हेच बळ
भारतीय म्हणून आपण का राहू शकत नाही ? गणेशोत्सव आला की त्या सणाला विरोध करणाऱ्या पोस्ट फेसबुक व्हाॕटस्अप वर झळकू लागतात.एकमेकांना पाण्यात बघण्याशिवाय आपण काही करणार आहोत की नाहीत ? जाती धर्मानुसार सर्व देशभक्तांना वाटून घेतलेय...देशभक्तांच्या कपाळावर जातीचे शिक्के मारुन ठेवलेत...परवा मिठाचा सत्याग्रह शिकवत असताना मला एक विद्यार्थी विचारत होता,' madam गांधीजी चांगले नव्हते ना ?' मी विचारलं, कुणी सांगितले तुला ? तर म्हणाला व्हाॕटसअपवर वाचले...काय उत्तर देणार त्याला इतिहासची शिक्षिका ? इतिहासाला बदनाम करायचं, ठराविक नेत्यांना गलिच्छ शब्दांत शिव्या हाणायच्या...इतर जातींच्या नावाने खडे फोडायचे हाच उद्योग करण्यासाठी काहीजणांनी fb account उघडल्याचे दिसतेय...एकी हेच बळ असते ह्याचा विसर पडत चाललाय..कोल्हापूरातल्या पुराच्या पाण्यात जातीधर्म वाहून गेले आणि माणुसकी हाच धर्म उरला...इतर धर्मांची, जातींची टर उडविणे हे सच्च्या भारतीयाला शोभत नाही...पुढच्या पिढीवर चुकीचे संस्कार करण्यासाठी सोशल मिडियाचा वापर करुन काहीजण राष्ट्रीय एकात्मतेत बाधा आणण्याचे काम करताहेत...
मला सर्व जाती धर्म समान आहेत...मी भारतीय आहे...माणुसकी हाच माझा धर्म आहे...
** अरुणा भोसले **
Comments
Post a Comment